हक्काच्या जमिनीसाठी येऊरमध्ये आदिवासींचा भर पावसात एल्गार

लॉकडाऊन मोडीत काढून ठाणे शहरात किसान सभेच्या झेंड्याखाली आदिवासींचे निदर्शने

ठाणे : गेले काही दिवस ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावर वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या आदिवासींना वनखात्याने अत्यंत मग्रुरीने दमदाटी करून ते कसत असलेल्या वनपट्ट्यांवर नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या गोरगरीब आदिवासींना उपजीविकेकरता मिळणारा हा काडीचा आधारही नष्ट होताना पाहून हे सर्व आदिवासी शेतकरी लॉकडाऊन असूनही किसान सभेच्या लाल झेंड्याखाली एकत्र आले आणि थेट येऊर येथील वनखात्याच्या कार्यालयावर धडकले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली वनाधिकाऱ्यांना भेटून ही कारवाई ताबडतोब थांबवण्याची मागणी किसान सभेने केली आणि २५/३० वर्षांपासून हे आदिवासी येथे राहात असून शेती करत असल्याचे पुरावे सादर केले. यानंतर झालेल्या सभेत शहरी भागातील अशा सर्व आदिवासींना संघटित करण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे यांनी केले आणि हा संघर्ष पुढे नेण्याचा निर्धार या सर्व आदिवासींनी केला. जमसंच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर आणि ठाणे शहरातील किसान सभेचे नेते दत्तू खराड यांनीही निदर्शकांना संबोधित केले. दत्तू खराड, किशोर खराड, शंकर डवले, राजू कडू, सुमन वाघ, अनिता लहांगे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.

 573 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.