इमारतीच्या सामुहिक गच्चीवरून विलगीकरण केलेल्या नागरिकांची ये जा सुरूच
डोंबिवली : एकीकडे पालिका क्षेत्रातील रूग्ण वाढत असताना पालिका आयुक्तांचे नेमके नियम काय आहेत यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना रूग्ण आढळलेल्या सोसायटीमध्ये पालिका अधिकारी सोसयाटीचे प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतात. तर दुसरीकडे थोड्याच वेळात सोसयाटीच्या प्रवेशद्वारावरील बांबु काढून टाकण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे काही सोसयटीच्या केवळ विंग सील केल्या तरी देखील सोसायटीमधील गच्ची एकच असल्याने क्वारंटाईनचे शिक्के असणारे अनेक नागरीक सोसायटीच्या गच्चीतून दुसऱ्या विंग मधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या आटोक्यात आणणे पालिका प्रशासनाला कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर वैद्याकीय अधिकाऱ्यांचे नियम वेगळे आहेत तर आयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांचे नियम वेगळे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
कल्याण – डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी संचारबंदीचे नियम शिथील केले आहेत. मात्र रूग्णांची संख्या वाढीस लागली तर पालिकेकडे रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी हॉस्पीटल आहेत का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रोजचे नियम बदलत असल्याने पालिका कर्मचारी देखील संभ्रमात असून आयुक्त नगरसेवकांना देखील विचारात घेत नसल्याची चर्चा सर्व नगरसवेकांमध्ये रंगली आहे.याआधी देखील महापालिकेने सुरूवातील प्रवेशद्वार बंद केले नाही मात्र नागरीक ऐकत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतरच पालिका कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराला कुलुप लावले आहे. मात्र सध्यस्थितीत पालिकेने नियम बदलले असून केवळ ज्या इमारतीमध्ये रूग्ण आढळले त्या इमारतीची रूग्ण राहत असलेली विंगच सील करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. मात्र इमारतीची सर्व विंगची गच्ची एकमेकांना जोडली असेल तर नेमके काय करावे यासदंर्भात अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच या संदर्भात नक्कीच विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग अधिकाऱ्यांना विचारले असता ईमारतीच्या सेक्रेटरीने गच्चीला कुलुप लावावे असे सांगण्यात आले तर इतर सोसयटीला लावलेल्या सील बद्दल बोलतना केवळ एकच विंग असलेल्या सोसायट्या सील करण्यात आल्या असल्याचे सांगितले.चौकशी करताना
कोरोना रूग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासनाकडून एक मीटर परिसरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते. यावेळी पालिकेचे कर्मचारी सोसयाटीतील व्यक्तीची कोणताही चौकशी न करता किंवा कोणतेही थर्मल चेकींग न करता केवळ नावे लिहून घेण्याची कामे करतात. त्यामुळे सोसाटीतील सदस्यांना कोरोना झाला आहे किंवा नाही याची कोणतीही पूर्वकल्पना महापालिका कर्मचाऱ्यांना येत नाही. डोंबिवलीतील एक सोसायटीत २७ मे रोजी महापालिका कर्मचारी येऊन गेले होते. मात्र त्याच सोसयटीमध्ये ४ जून रोजी कोरोनाचा रूग्ण आढळल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीची तपासणी केली नसल्याचे सिध्द झाले आहे.
517 total views, 1 views today