भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ आणि फ्रेडस युनिटी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते आयोजन
डोंबिवली : सध्या परिस्थिती कोरोना महामारी सोबत आपल्या देशा सोबत आपलं राज्य ही लढत आहे, प्रशासन , पोलिस , डॉक्टर , नर्स , सफाई कामगार आपल्या परीने प्रयत्न करत आहेतच पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपलाही कर्तव्य आहेच म्हणून ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महागणपती मंदिर हॉल , डोंबिवली येथे भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यकक्षा सुहासिनी राणे ह्यांनी आपलं समाजाप्रती कर्तव्य ओळखून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ठाणे आणि परिसरात रक्तदान शिबिर आयोजनात अग्रेसर असलेली सामाजिक संस्था फ्रेंड्स युनिटी फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि परिसरातील अनेक आणि तरुण , तरुणींनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.तसेच ह्या वेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक आल्बम -३० ह्या होमिपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
622 total views, 2 views today