कल्याण स्टेशन परिसरातील एटीएम चोरट्यांनी लुटले

एटीएम न फोडता हायटेक पद्धतीने लांबवली रोकड

डोंबिवली : एकिकडे कोरोनाची भीतीमुळे धास्तवलेल्या नागरिकांचे लोकडाऊन काळात हाल झाले .सर्वत्र कोरोनाची भीती पसरली असताना काही चोरट्यानि मात्र संधी साधली .रात्रीच्या सुमारास निर्मनुष्य झालेल्या कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परीसरातील एका बँकेच्या एटीएमवर का चोरट्याने हायटेक पद्धतीने डल्ला मारला .विशेष म्हणजे एटीएमच्या सिस्टीममधील गुप्त कोडचा वापर करून एटीएममधील लॉकर उघडत आतील मोठ्या नोटा चोरट्याने पळवल्याने चोरीची माहिती मिळण्यासाठी बराच कालावधी गेला. काल रात्रीच्या सुमारास हा चोरटा एटीएमच्या सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी करोनामुळे मास्क घातल्याने या चोरट्याची ओळख पटवून त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसासमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम असून हा परिसर दिवसा रात्री गजबजलेला असतो. मात्र करोना लॉकडाउन काळात मागील अडीच महिन्या पासून या परिसरात स्मशान शांतता पसरलेली होती. याच शांततेचा फायदा घेत चोरट्याने बँकेच्या एटीएम मधून हायटेक पद्धतीने गुप्त कोड खोलत आतील रक्कम चोरली.यामुळे याची माहिती सुरक्षा रक्षकासह, इतरांना कळण्यास उशीर झाला. बँकेला एटीएममधील रक्कम संपल्याची माहिती मिळाल्या नंतर या एटीएममध्ये चोरी झाल्याचे उघड झाले या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करत सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.दरम्यान याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

 367 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.