शाळांच्या फी मध्ये पालकांना सवलत द्या

शिक्षकांच्या कार्यसमिती मार्फत पालकांची बैठकीत घेण्याची डोंबिवली मनविसेची मागणी

डोंबिवली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक माध्यमाच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने चालणार आहेत. तरी बऱ्याच शाळा पालकांकडे फी साठी तगादा लावण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन शाळा सुरू असल्याने शाळांमध्ये काही खर्च कमी होणार आहेत. उदाहरण म्हणजे कॅन्टीन,बस,क्रीडा तरी सध्या बऱ्याच पालकांवर सुद्धा आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कार्यसमिती मार्फत (p.t.a.) मिटिंग घेऊन ती फी सवलत पालकांना देण्यात यावी. यासाठी सहानुभूती पूर्ण विचार करावा. तसे आदेश सर्व शाळांना द्यावे अशी मागणी मनविसे डोंबिवली कडून करण्यात आली आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी तडवी व गटशिक्षणाधिकारी कल्याण तहसील अत्तरदे यांची मनविसेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि तश्या आशयाचे निवेदन सुद्धा दिले आहे. निवेदन देताना मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे,मनविसे डोंबिवली शहर सचिव कौस्तुभ फडके, शाखा अध्यक्ष स्वप्नील वाणी, महेश बुट्टे हे उपस्थित होते.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.