कोरोना भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन करा

जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती लोकां पर्यत पोहचवण्याचे मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

ठाणे : करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आहे. ही भिती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करा अशा सुचना मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. करोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेख यांनी जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डँशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करुन द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करुन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा.करोना सारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल मीडियातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या असेही ते म्हणाले.

एखादी व्यक्ति परदेशातून आल्यानंतर त्यासाठी आयसोलेशन व कोरेनटाईन कक्ष तयार ठेवा. नव्याने ऊभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना शेख यांनी केल्या. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व उपाययोजनांची माहिती दिली.

 596 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.