मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंब्रा गर्भवती महिला प्रकरणी सोमय्या यांची मागणी

ठाणे मुंबईत एक लाख कोरोनाबाधित होणार

ठाणे : रुग्णालयांनी दाखल करून न घेतल्याने मुंब्रा येथील महिलेचा इस्पितळाच्या दारातच झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी सरकारला घेरण्याचा निश्चय भाजप नेत्यांनी केल्याचे दिसत आहे. आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक संजय वाघुले यांना मुंब्रा येथे जाऊन पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी पोलीस आयुक्तांनी नाकारली होती. यावेळी आयुक्तांशी झालेल्या बैठकीत हा मृत्यू म्हणजे राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यांचे सपशेल अपयश असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. सदर मृत्यूला सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून सर्व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीच मागणी त्यांनी केली. अशा प्रकारे गोरगरिबांचे मृत्यू होत आहेत पण आरोग्यमंत्री मात्र फेसबुक वर आपला फेस दाखविण्यात मग्न असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. खाजगी रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याने गरिबांना कोणी वालीच उरला नसल्याचे ते म्हणाले. कोव्हीडसाठी सर्व रुग्णालये आरक्षित केली जातं असल्याने गर्भवती महिला आणि इतर गंभीर आजार झालेल्यांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील काळात फक्त ठाणे आणि मुंबई मध्येच जवळपास एक लाख नागरिक कोरोनाबाधित होणार असून यासंदर्भात उद्धव सरकारकडे काय रणनीती आहे असा खडा सवाल त्यांनी केला.

 694 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.