माजी आमदार नरेंद्र पवारांतर्फे आर्सेनिक अल्बम ३० होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप

१ लाख नागरिकांना नागरिकांना औषध देण्याचा संकल्प, आतापर्यंत २५ हजाराहून अधिक नागरिकांना दिले औषध

डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गेली ३, महिने लॉकडाऊन असूनही वाढणारा प्रसार लक्षात घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या “आर्सेनिक अल्बम ३०” या होमीओपॕथीक गोळ्या एक लाख नागरिकांना मोफत वाटप करणार असल्याचा संकल्प माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी केला आहे. या गोळ्या वाटपाची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत २५ हजारपेक्षा जास्त नागरिकांना याचे घरपोच वाटप केले आहे.

गेली तीन महिने कोरोना मुक्तीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नरेंद्र पवार हे सक्रियपणे काम करत आहेत. गरजूंना धान्य वाटप, भोजन वाटप, भाजीपाला आपल्या दारी, डॉक्टरांना पीपीइ गाऊन वाटप व कामगारांना आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था सुध्दा यांनी केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने जाहीर केल्यानंतर तातडीने गोळ्या उपलब्ध करत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील तब्बल एक लाख नागरिकांना या गोळ्या घरी पोहच करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या गोळ्या सर्वांना उपयुक्त असून दिवसातून एकदा सकाळी अनुशापोटी चार गोळ्या असे तीन दिवस या गोळ्या घ्यायच्या आहेत. रक्तदाब व मधुमेह असणाऱ्यांनी देखील या गोळ्या घ्यायला हरकत नाही. या तीन दिवसांमध्ये कच्चे कांदे, कच्चे लसूण व कॉफी अशा पदार्थांचे सेवन करु नये तसेच डायलिसिस रुग्ण व गर्भवती महिलांनी या गोळ्या घेऊ नयेत.इतर औषधी गोळ्यांचे सेवन करताना त्या गोळ्यांना स्पर्श करु नये अशा सूचनाही दिल्या जात आहेत. आत्तापर्यंत मोहिली, उंबर्ली, शंखेश्वर प्रेसिडेन्सी, अटाळी, रामबाग, गाळेगाव, आंबिवली, गांधारी आदी परिसरात तब्बल २५ हजार नागरिकांना गोळ्यांचे वाटप केले आहे. येत्या तीन – चार दिवसात उर्वरित परिसरात गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळा, आपली व आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्या असे आवाहनही यावेळी नरेंद्र पवार यांनी केले. या २५ हजार नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या पोहचविण्यासाठी डॉ. कापरेकर, महेश चौधरी, महेश केळकर, एस. एम. जोशी, सुहास चौधरी, देवस्थळी, संजय कारभारी, बाळू साळुंखे, काळुराम पाटील, संजय पाटील, अनंता पाटील, अपर्णा पाटील, बजरंग तांगडकर, अमित पवार, अर्जुन म्हात्रे, शनिवार केणे, विनोद , दिलीप सिंग, संदीप गायकवाड, हेमंत गायकवाड, पोलीस पाटील अनंता पाटील, नाना पवार, शारदा बबन गायकवाड, संतोष शिंगोळे, प्रकाश गायकर, बळीराम अंबारे, पोलीस पाटील अशोक म्हात्रे, मदन ठाकरे, विजय शिंगोळे, शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, कैलास पाटील, अनंता (अण्णा) पाटील, दशरथ पाटील, आकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 621 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.