बीएफएसआय क्षेत्राचा बदलता चेहरा व तंत्रज्ञानाची भूमिका

ब-याच काळापासून भारत आपल्या औपचारिक अर्थव्यवस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सुदैवाने, तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे हे काम अधिक सोपे झाले. आज भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येने ५०० दशलक्षांचा आकडा ओलांडला आहे. ही वाढ दोन अंकी दराने सुरू आहे. सिस्कोच्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत हा आकडा ९०७ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. या परिवर्तनामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणूनच सध्या बीएफएसआय क्षेत्र कसे बदलत आहे, तंत्रज्ञानाची यात काय भूमिका आहे यावर एक नजर टाकुयात.

नवा भारत: बँकिंग सेवेचा सर्वांच्या घरात प्रवेश

आज भारतातील सर्वांच्या घरात बँकिंग सेवांचा प्रवेश झाला आहे. या परिवर्तनात २०१४ मध्ये सुरु झालेली पंतप्रधान जन धन योजना प्रमुख चालक बनली. याद्वारे आजच्या घडीला ३८.०६ कोटी बँक खाती उघडली गेली आहेत. युपीआय, रुपे डेबिट कार्डसारख्या इतर उपक्रमांमुळेही हा कल वाढला. याच धर्तीवर, भारतनेट मिशनद्वारे दुर्गम भागात इंटरनेटचा प्रवेश होत आहे. त्यामुळेच तंत्रज्ञान प्रणित बीएफएसआय सेवांचा मार्गही सुलभ होत आहे.

आधुनिक बँका एका बटणाच्या स्पर्शावर उपलब्ध

भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढतच असल्याने किरकोळ टचपॉइंट्समुळे बँकेत होणारी गर्दी आता फार काळ दिसणार नाही. त्यांच्या स्मार्टफोन अॅप्लिकेशन या डिजिटल स्वरुपात बँका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील. आधीसारखेच व्यवहार फार वेळ न घेता पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सक्षम केले जात आहे. यूपीआयच्या चमत्कारी तंत्रज्ञानामुळे (बँक आणि नॉन बँक प्रदात्यांमधील इंटरऑपरेबिलिटीसह)व्यवहारांसाठीची किंमत आणि टर्नअराउंड वेळही कमी केला आहे. दुर्गम भागातील एईपीएस (आधार सक्षम पेमेंट प्रणाली) द्वारे भारताने बायोमॅट्रिक व्यवहारांमध्येही वाढ केली आहे. एईपीएसमध्ये दरमहा २०० दशलक्षहून अधिक व्यवहार होतात.

गुंतवणुकीचे बदलते स्वरुप

यापूर्वी भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात एफडी, आरडी आणि रिअल इस्टेट यासारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून होते. दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे बदल घडत असताना गुंतवणुकीचे स्वरुपही बदलले. २ टीअर आणि३ टीअर शहरांमधील किरकोळ गुंतवणूकदारदेखील म्युच्युअल फंड आणि समभाग यासारख्या प्रगत गुंतवणूक उत्पादानांचा वापर करत आहेत. एलएसई गुंतवणुकदारांचीही गेल्या दशकात हळू हळू ११ टक्क्यांच्या सीएजीआरसह वाढ झाली. त्यांची संख्या सध्या २.७८ कोटी आहे. दुसरीकडे, सध्या बीएसईमध्ये सुमारे ४.५८ कोटी गुंतवणूदार आहेत. हा आकडा मागील वर्षात २६ टक्क्यांनी वाढला आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे, ट्रेडिंग अॅप्लिकेशन्स तसेच रोबो अॅडव्हायजर्स (माहिती विश्लेषक आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससचा वापर करून वैयक्तिक गुंतवणुकीचा सल्ला देणारे इन्व्हेस्टमेंट इंजिन) यांचा वापर करून गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.

हळू हळू स्वीकार वाढतोय

स्वीकार हा डिजिटल सेवांच्या प्रवेशासाठी कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. सुदैवाने, भारतात आम्ही आघाडीवर एक सकारात्मक मार्ग पाहिला आहे. काही ठळक घटनांनीही या वळणाला आकार दिला आहे. उदा. नोंटबंदीनंकर डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास वेग मिळाला. कोव्हिड-१९ च्या काळातही असाच कल दिसून आला. कोव्हिड-१९ चा उद्रेक शिगेवर असताना, एईपीएसचा उपयोग दुर्गम भागातील लोकांना त्यांच्या घरून रक्कम मिळवण्यासाठी झाला. अशा घटनांमध्ये एफआयची तंत्रज्ञानविषयक सक्षमता बाजारातील ट्रेंडला आकार देण्यात मह्त्वाची भूमिका बजावते.

बीएफएसआय क्षेत्र अनुभवत असलेले हे काही महत्त्वाचे बदल आहेत. सध्या जगातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी लोकसंख्या वेगाने डिजिटल होत आहे. त्यामुळे बाजाराचे भविष्य अधिकाधिक आशादायी आहे, हे आपल्याला माहिती आहे.

रोहित अंबोस्ता

सहाय्यक संचालक व मुख्य माहिती अधिकारी, एंजल ब्रोकिंग लिमिटेड

 561 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.