स्थानिक युवकांनी नोकरीसाठी मनसेकडे नाव नोंदवावी

मनसेच्या शहर अध्यक्षांचे बेरोजगारांना आवाहन


अंबरनाथ : यापुढे स्थानिक कामगारांना नोकऱ्या दिल्या जाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ मधील औद्योगिक संघटनांकडे केली आहे. अंबरनाथ शहरातील एमआयडीसीच्या संस्थांना लेखी पत्र देऊन १०० टक्के स्थानिकांनी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी स्थानिक युवकांनी नोकरीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन महराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने लाखो परप्रांतीय आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात कामगारांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. अंबरनाथ शहरात आशिया खंडातील मोठी एमआयडीसी असून येथील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार काम करीत होते. आता या कंपन्यांना कामगारांची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आता यापुढे स्थानिक कामगारांना नोकऱ्या दिल्या जाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी कडे केली आहे. अंबरनाथ शहरातील एमआयडीसीच्या संस्थांना लेखी पत्र देऊन १०० टक्के स्थानिकांनी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. आमा चे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या कडे लेखी निवेदन देऊन हि मागणी करण्यात आली आहे. मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष धंनजय गुरव आदी पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.
स्थानिक युवकांनी नोकरीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केले आहे. भविष्यात नोकरीसाठी स्थानिक युवकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.
नोकरीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून अथवा मोबाईल वर संपर्क साधून नाव नोंदणी करू शकता असेही कुणाल भोईर यांनी सांगितले. पूर्व विभाग : जिल्हा संघटक संदीप लकडे – ८८०६८८२५९२; धनंजय गुरव – ९३२२४९००३०; अविनाश सुरसे – ९३२२१२५०६७. पश्चिम विभाग : युसूफ शेख – ९३२३९५४४७४; महेश टोपले- ७७९८४९९८०२; संदीप भोईर – ७७७६०५७०१६.

 498 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.