पायल कबरे यांच्या तर्फे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

अत्यावश्यक वस्तूमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा समावेश नाही

अंबरनाथ : कोरोना व्हायरसवर उपाययोजने अंतर्गत करण्यात आलेल्या लाॅकडाउन मुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडु नये म्हणून सरकारने व अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन नागरिकांपर्यंत रेशन, धान्य, भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पायल कबरे यांनी मात्र महिलांची अडचण लक्षात घेऊन एक हजार महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पायल कबरे यांनी स्थानिक महिला बचत गटांमार्फत हे सॅनिटरी नॅपकिन तयार करवून घेऊन मग वाटप केले.
पायल कबरे यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात त्यांच्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे सरकार कोरोनाशी सामना करण्यासाठी नागरिकांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उद्युक्त करत असताना या समाजाच्या जवळ जवळ पन्नास टक्क्यांच्या प्रमाणात असलेल्या महिला वर्गाला दर महिन्याला सामोरे जावे लागत असलेल्या मासिक पाळीसाठी आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकीन अत्यावश्यक वस्तूंमध्ये दिसत नव्हते. मेडिकल दुकांनात चौकशी करता त्यांच्या असे लक्षात आले की याचा पुरवठा आणि साठाही दुकानदारांकडे व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध नाही. हे लक्षात आल्यावर पायल कबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सॅनिटरी नॅपकीन महिलांना घरपोच मिळवून देण्यासाठी व महिलांच्या या महत्त्वाच्या आरोग्याच्या प्रश्नांवर जागरुकता निर्माण व्हावी म्हणून मोठी चळवळ उभी करण्याचा संकल्प केला. याचाच एक भाग म्हणून २८ मे रोजी “जागतिक महिला मासिक पाळी दिना”चे औचित्य साधून एक हजार महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन सदर सॅनिटरी नॅपकिन स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आले व यापुढे हि चळवळ महिलांमध्ये सुरु रहावी व त्यांना हे सॅनिटरी नॅपकीन स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून येथील महिला बचत गटांमार्फत महिलांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन किफायतशीर दरात उपलब्ध करण्यात आल्याचे पायल कबरे यांनी सांगितले.

 499 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.