तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन

केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.
सवलती ८ जून पासून लागू होणार असून पहिल्या टप्यात
कंटामेंन्ट झोनच्या बाहेरील सर्व देवस्थान, धार्मिक स्थळे खुली राहणार.
हॉटेल, रेस्टॉरंट यासह हॉस्पीटॅलिटीच्या सेवा सुरू होणार.
शॉपिंग मॉल्स.
आदी गोष्टी पहिल्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तर दुसऱ्या विभागातील-शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग सेंटर सरकारांशी चर्चा करून सुरु करता येणार आहेत. मात्र त्या जुलै महिन्यापासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात
परिस्थितीपाहून: आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी वाहतूक ज्यांना केंद्रीय गृहविभागाने परवानगी दिलीय त्यांच्यासाठीच.
मेट्रो रेल, चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बारस-ऑडीटोरियम, असेंब्ली हॉल-सिमिलर ठिकाणी सुरु होणार.
सामाजिक, राजकिय, धार्मिक, शैक्षणिक, मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम घेता येणार.

 594 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.