ललिता ताम्हणे यांचे निधन

सिनेपत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तव आणि सत्याचा केला होता पुरस्कार

ठाणे : ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारांमुळे वयाच्या ६०व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते. मृदू,लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिनेपत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तवआणि सत्याचा पुरस्कार त्यांनी आपल्या बातम्यांत केला. त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल. त्यांनी स्मिता, स्मित, मी:स्मिता पाटील, नूतन, “तें’ची प्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तकें रसिकांना आवडली होती. आणि अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. सध्या त्या दीप्ती नवलचं चरित्र लिहीत होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे.

 632 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.