गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आले शिबिर
डोंबिवली : लोकनेते गोपिनाथ मुंडे स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पूर्व मंडल कडून कै.वामनराव ओक रक्तपेढी ह्यांच्या सहाय्याने राज्यातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या रक्तदान करा ह्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद म्हणून डोंबिवलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ३ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत भाजपा मध्यवर्ती कार्यालय, नव-डोंबिवली सोसायटी, रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पू) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क – श्रेयस +918108487700 आणि अथर्व +919820310909 वर संपर्क साधावा. सोशल डिस्टन्सिंग चे नियम व योग्य ती काळजी घेऊन शिबिराचे आयोजन केले आहे.
506 total views, 1 views today