खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
डोंबिवली : सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबांधत्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हाथ धुण्यासाठी सॅनिटायझरचा वाटप मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरचा बाजारपेठेत तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकासह, उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ परिषद यांना १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईड वितरीत करण्यात आले आहे. सर्व गृह संकुलात, तसेच महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यासाठी लागणारे जंतुनाशक सोडियम हायपोक्लोराईड रसायन उपयुक्त आहे. म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जास्त लोकसंखेच्या वाड्या – वस्त्यांमध्ये फवारणी करण्यासाठी दीड हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक रसायनाचा मुबलक साठा म्हणून खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व महापालिकांना उपलब्धता करून दिल्यास प्रशासनाने त्यांचे आभार मानले. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित होते.
516 total views, 2 views today