कोरोना बाधित रुग्णांसाठी केली मोफत रुग्णवाहिकेची सोय
डोंबिवली : कोरोना बाधित रुग्णांपैकी काही रुग्णांना पालिका प्रशासनाकडून वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.या प्रकारामुळे एकीकडे पालिकेच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे नगरसेवक कुणाल पाटील यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र दिले आहे. नगरसेवक पाटील यांनी त्यांच्याकडील रुग्णवाहिका कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत देत असल्याचे पत्रात म्हणले आहे.
नगरसेवक कुणाल पाटील यांनी कोरोन बाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णावाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिक त्यांचे आभार मानत आहेत.या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु व्हावे म्हणून रुग्णवाहिकेची सेवा मोफत देत असल्याचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. नगरसेवक पाटील यांच्या या समाजकार्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. अश्या प्रकारे समाजातील अनेकांनी रुग्णांसाठी रुग्णवाहिकाउपलब्ध करून दिल्यास पालिका प्रशासनाला रुग्णांवर लवकरात लवकर उपचार मिळण्यास सोपे जाईल.
481 total views, 1 views today