अंबरनाथ मध्ये होमिओपॅथी अर्सेनिक अल्ब ३० या गोळ्यांचे वाटप

भाजपचे सर्जेराव माहूरकर यांनी राबवला उपक्रम, १००० कुटूंबाना दिले औषध

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ४५, वडवली दत्तमंदिर परिसर सह, अंतर्गत येणारे प्रसन्न लेन, बाँबे हाऊस, वर्षा कॉम्प्लेक्स, शाहिद मुरलीधर चौधरी मार्ग, ताडवाडी व प्रभागातील इतर सोसायट्यातील सर्व नागरिकांना होमिओपॅथी अर्सेनिक अल्ब ३० या गोळ्यांचे प्रभागातील सुमारे १००० कुटुंबात वाटप करण्यात आले. भाजपचे पदाधिकारी सर्जेराव माहूरकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
आयुष मंत्रालय केंद्रसरकार व महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्यानुसार कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागातील नागरिकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तमाम नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बोधी क्लीनिक च्या डॉ करुणा मिलिंद आहिरे यांनी प्रमाणित केलेल्या होमिओपॅथी अर्सेनिक अल्ब ३०(ARSENIC ALB)30 या गोळ्यांचे प्रभागातील सुमारे १००० कुटुंबात वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे पूर्व शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते कैलास जाधव, विजय पोखरकर, विजय जाधव, मेहुल जाधव, अभिजीत सोलंकी, महेश तावरे, प्रदीप पाटील, किरण गायकवाड, गिरीष बोरसे, प्रमोद जगताप, राजेश मगर यांचे मोलाचे योगदान मिळाले. अंबरनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजीभाई धल व भाजपा अंबरनाथ व्यापारी शहर अध्यक्ष भगवानभाई सोलंकी, जॉन अलेक्स अंबरनाथ व्यापारी संघटनेचे सदस्य राजेंद्र (अप्पा) कुलकर्णी, उपाध्यक्ष भाजपा अंबरनाथ शहर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गोळ्यांचे सोबत दिलेल्या सूचनांचा अवलंब करून सदरचे औषधाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सर्जेराव माहुरकर मो.नं.8275593592, 9422480705 यांचेशी संपर्क साधावा.

 419 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.