खाजगी रुग्णालयांची हजारोंची उड्डाणे सुरूच

पालकमंत्री, महापौरांची घोषणा `क्वारंटाईन’

भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

ठाणे : शहरातील होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू नागरिकांना मोफत उपचाराची पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांची घोषणा महापालिकेतच `क्वारंटाईन’ राहिली. अद्यापि खाजगी रुग्णालयांचे बिल उकळणे सुरूच आहे. एका रुग्णालयाने अवघ्या अडीच दिवसांचे २४ हजार रुपये आकारल्याचा प्रकार घडला आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली. त्यात चार रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी केल्या. त्याची प्रसिद्धीही झाली. मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर ठणाणा' आहे. संबंधित रुग्णालये मोफत उपचार करतात कीपठाणी’ वसुली करतात, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पालकमंत्री व महापौरांनीही त्यावर नजर ठेवलेली नाही. त्याची घोषणा क्वारंटाईन राहिली असून, त्यामुळे अवाच्या सवा वसुली सुरूच आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला.
पाचपाखाडीतील एका रुग्णालयाने अवघ्या अडीच दिवसांत कोरोनाच्या रुग्णाला डिस्चार्ज देऊन, भाईंदरपाडा येथील केंद्रात क्वारंटाईन राहण्यास सांगितले. या रुग्ण महिलेकडून २४ हजार रुपये वसूल करण्यात आले, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

क्वारंटाईन' सेंटरकोरोना’ची
निर्मिती केंद्रे होऊ नयेत : नारायण पवार

ठाणे शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधांचा बोजवारा उडत असल्याचे अनेक वेळा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत क्वारंटाईन सेंटरमधून अनुक्रमे ६०, २३ आणि १०० रुग्ण मिळाले. क्वारंटाईन' केल्यामुळेकोरोना’चा प्रसार टाळल्याचे म्हणत प्रशासन पाठ थोपवून घेत आहे. मात्र, या केंद्रातून मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने तेथून कोरोनाचा प्रसार होत असल्याची भीती आहे. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर कोरोनाची निर्मिती केंद्रे होऊ नयेत, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

 349 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.