बदलापूरमध्ये “बारामती पॅटर्न” राबवावा

राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांची शहर प्रशासनाकडे मागणी


बदलापूर : बदलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी बदलापूर शहरात “बारामती पॅटर्न” राबविण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांनी प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे.
बारामती पॅटर्न म्हणजे कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रभागात आरोग्य समितीची स्थापना करण्यात येते. या समितीमध्ये डॉक्टर, परिचारिका, स्थानिक नगरसेवक, प्रत्येक राजकीय पक्षाचे एक एक प्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका, खाजगी लॅब टेक्निशियन यांचा समावेश करण्यात आला आहे. हि समिती प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. त्याच प्रमाणे कोरोना संदर्भात माहिती घेऊन हि समिती आपला अहवाल प्रशासनाला सादर करीत असते. त्यावर प्रशासन कारवाई करते. परिणामी कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होत आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात बारामती पॅटर्न लागू करण्याबाबत बैठक घेतली असल्याचे कालिदास देशमुख यांनी आपल्या निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे. बदलापूर शहरातसुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी बारामती पॅटर्न राबवावा अशी मागणी कालिदास देशमुख यांनी बदलापूरचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे.

 354 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.