कोरीना बाधित रुग्णांवर उपचारासाठी लाखोंची बिले का?

मनसे पदाधिकारी गणेश कदम यांचा सरकारला प्रश्न .

डोंबिवली : देशात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या जास्त आहे. या रुग्णांवर सरकार उपचार करून बरे करत आहे. उपचार करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील खाजगी रुग्णात अश्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पुरते वैतागले असल्याने यावर सरकार का बोलत नाही अशी विचारणा होत आहे. लॉकडाऊन मध्ये हातात काम नाही, नोकरीवर जाता येत नसल्याने पगार नाही अश्या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र तसे न होता आता अश्या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास लाखोंची बिले आकारली जात आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी कोरीना बाधित रुग्णांवर उपचारासाठी लाखोंची बिले का आकारली जातात असा थेट सवाल सरकारला केला आहे.

 551 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.