त्यांनी जपला वसा सामाजिक बांधिलकीचा

कोरोनाच्या संकटात महिला व बाल कल्याण समिती  सभापती सपना भोईर यांची गरजूंना मदत

ठाणे : कोरोनाच्या संकटात सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना राजेंद्र भोईर यांनी  राहनाळ केवणी गटात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन आणि जनतेतील समन्वय साधत खबरदारीच्या उपाययोजना करत  विविध घटकातील गरजूंना मदतीचा आधार दिला आहे.

गोर-गरीब नागरिक, सहराज्यातील मजूर, स्थलांतरीत लोकं, वीटभट्टटी कामगार, गोडाऊन मध्ये काम करणारे कामगार, आदी घटकातील प्रत्येक नागरिकाला जी मदत आवश्यक आहे ती मदत करण्यासाठी त्या तत्परतेने कार्यरत आहेत. परोपकार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कामात कार्यरत असून यासाठी पती राजेंद्र भोईर यांची उत्तम साथ मिळत आहे.

या काळात सावित्रीबाई फुले नगर, चरणीपाडा, रेल्वेलाईन-हळवेपाडा, दापोडे गाव, लक्षमणनगर, मनिसुव्रत कॉम्प्लेक्स, आदि ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासह सामूहिक  भोजन व्यवस्था त्यांनी केली.  तसेच राहनाळ, केवणी दिवे गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

वीटभट्टीवरील बालकांसह गरोदर माता यांना सकस पौष्टिक आहार वाटप करण्यात आला.तसेच गरोदर व स्तनदा मातांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे संचालित शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह ,उल्हासनगर येथे मुलांना कपडे वाटप, मास्क आणि खाऊचे वस्तू वाटप करण्यात आले.

राहनाळ गावातील शिधा वाटप दुकानावर स्वतः जाऊन मोफत धान्य वाटप करताना सरकारच्या सूचनांची पायमल्ली होऊ नये यांसाठी त्यांनी रेशनदुकानदारांना सूचनाही केल्या. भारतीय खाद्य निगम गोडावणात काम करणाऱ्या कामगारांना जेवणाची व्यवस्था  भोईर  करत आहेत. मोलमजुरी करणारे गरीब, निराधार, घरकाम करणाऱ्या महिला, वाहन चालक, हमाल, सुरक्षा रक्षक आदींच्या जेवणाची सोयही त्यांनी केलीं आहे.राहनाळ गटात कोणीही उपाशी राहू नये यासाठी त्या दक्षता घेत आहेत.

नेहमी विविध भागात जाऊन त्यांचा पाहणी दौरा  सुरूच आहे.नित्याने भोजन वाटप सुरू आहे.शिवाय गटातील विविध विकास कामही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दाभाड, सरळगाव, घसई, पडघा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केली होती.  

काही दिवसांपूर्वी डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका , आशा कार्यकर्ती यांच्यासाठी भोईर यांनी फेससील्ड, सॅनिटायझरचे वाटप करून नागरिकांची काळजी घेणाऱ्या घटकांना स्वतःची काळजी घेण्याचेही आर्जव केले. कोरोनाच्या भीषण काळात जनतेच्या अडचणी दूर करणे, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कार्यरत असल्याचे सपना भोईर यांनी सांगितले.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.