कोरोनोच्या महामारीत कलावंत आणि निवेदकांना केली मदत
डोंबिवली : अभिनेत्री उपासना सिंग व हरेश शिवलकर यांनी एक एजीओची स्थापना केली. अभिनेत्री उपासना सिंग यांच्या मातोश्री संतोष फाउंडेशन असे नाव आले. कोरोनोच्या महामारीत समाजातील गरजवंताना ही संस्था मदत करत आहे.मुंबई,ठाणे,विरार,वसई,कल्याण-डोंबिवली,बदलापुर,पनवेल,नवीमुंबई ह्या सर्व भागात पोलीसकर्मी,टीवी कलावंत, स्टेज कलावंत व गरीब गरजवंतांना जिवनावश्यक वस्तु, धान्य,औषधे ,नाश्ता जेवण,कपडे मदत स्वरुपात देत आहेत.ह्या साठी ह्या संस्थेचे अध्यक्ष (वडाळा विभाग शाखा क्र.१७२ चे शिवसेना शाखा प्रमुख) हरेश शिवलकर व अभिनेत्री उपासना सिंग तसेच त्यांचे सभासद दिवसरात्र कार्यरत आहेत. डोंबीवलीतील निवेदक प्रविण गायकवाड ( शिवा ) यांनी काही दिवसापुर्वी कलावंतांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. आज अनेक सेवाभावी संस्था नक्कीच पुढे येत आहे.कृपया शासनानेहि कलावंताकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे.
513 total views, 2 views today