भाजपाचे घरोघरी “महाराष्ट्र् बचाओ” आंदोलन

राज्यातील सद्य परिस्थितीत तीन पायांचे सरकार जबाबदार अशक्यच केला आरोप

अंबरनाथ : जनतेची उपासमार, परप्रांतियांची होलपट होत आहे. लोकांना दारूची नाही तर अन्नधान्य आणि निवा-याची गरज आहे. मात्र हाॅस्पिटलमध्ये तासंतास रूग्णांची विचारपुसच होत नाही. सरकार रूग्णांना साधी रुग्णवाहिकेची व्यवस्था करू शकत नाही. अश्या नाकर्त्या सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने “महाराष्ट्र् बचाओ” आंदोलनातुन निषेध करत असल्याचे भाजप नेते गुलाबराव करंजुले यांनी सांगितले. अंबरनाथ शहरात घरोघरी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र् शासन हे एक विचाराचे राहिलेले नाही. तीन पक्षाचे तीन चाकी सरकार आहे. सकाळी गृहमंत्री सांगतात दारूची दुकाने उघडा तर दुपारी मुख्यमंत्री दुकाने बंद करण्याचे आदेश देतात. सायंकाळी तीसराच निर्णय होत असतो. सध्या रूग्णालयातील उपचाराचे वैद्यकिय नियोजन एक प्रकारे कोरोनावर इलाजापेक्षा क्वाॅरंटाईनचा जिव घेणा खेळ सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सुमारे दिड हजार लोकांचे बळी घेतले. आज पर्यंत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र् पुढे असायचे परंतु आज परिस्थिती भयानक बदलली आहे. याला हे तीन पायाचे सरकार जबाबदार असल्याचे गुलाबराव करंजुले यांनी सांगितले.
अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहराध्यक्ष अभिजीत करंजुले यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण अंबरनाथ शहरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरीच थांबुन, सोशल डिस्टंन्सिगचे तंतोतंत पालन करत “महाराष्ट्र् बचाओ”चा नारा देत, हाताला काळी फित बांधुन राज्य सरकारचा निषेध केला.
महाराष्ट्र् सरकार कुठेतरी विनाचारी दिशेने वाटचाल करत आहे. कुठेही शासन आणि अधिकारी- प्रशासनाचा ताळमेळ राहीलेला नाही. देशातल्या कोरोना बाधीतमध्ये राज्यात ४५ टक्काहुन अधिक कोरोनाचा प्रादुर्भाव ओढवला असताना राज्य सरकारला याच गांभिर्य राहलेले नाही. केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातुन स्वतःची वाहवा करून घेतली जात आहे. जनतेवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र शेजारच्या कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील जनतेला आर्थिक मदत करून दिली आहे. अगदी मजदुर, रिक्षाचालक ते पेपर टाकणाऱ्या कामगारांनाही मदत करत आहेत.
केंद्र सरकारकडुन जनधन योजना माध्यमातुन लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रूपयांची मदत जमा केली जात आहे. कामगारांना हक्काची मदत मिळत नाही. त्यामुळे स्थलांतरण करून कामगार गावी जावु लागले आहेत. उद्या जेव्हा लाॅकडाउन उघडले जाईल तेव्हा सर्वच उद्योग-धंदा क्षेत्रात कामगारांचा मोठा तुटवडा निर्माण होईल आणि त्यावेळी जे आर्थिक संकट निर्माण होईल त्याद्वारे होणाऱ्या लाॅकडाउन पेक्षा मोठया आर्थिक नुकसानाला राज्य सरकार जबाबदार असेल असे गुलाबराव करंजुले यांनी सांगितले.
संपुर्ण राज्यात शांतताप्रीय आणि सोशल डिस्टंन्सिगचे काटेकारपणे पालन करून महाराष्ट्र् बचाओ आंदोलन सुरू असताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथमध्येही आपआपल्या घरातच राहुन हाताला काळी फित बांधुन राज्य सरकारचा निषेध केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अभिजीत करंजुले यांनी सांगितले. भाजप महीला शहराध्यक्षा सुजाता भोईर, पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राजेश कौठाळे, दिलीप कणसे, राजु महाडीक, रोहित महाडीक, विश्वजीत करंजुले, संतोष शिंदे, खाजनी धल, विश्वास निंबाळकर, राजेश नाडकर, नितीन परब, श्रीकांत रेड्डी आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पुर्व, बी-केबीन रोड, भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालया समोर राज्य सरकारचा निषेध केला.

 329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.