राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी राबवला उपक्रम
बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस बदलापुर शहर कडून राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या सहकार्य ने शहरातील जवळपास अबोली रिक्षा चालकांना धान्य वाटप करण्यात आले.
सध्य पारिस्थितीत समाजातील सर्व घटकांना विविध संकटाना सामोरे जावे लागते. दोन दिवसा पूर्वी अबोली रिक्षाचालकांचे प्रश्न कालिदास देशमुख ह्यांच्या कानावर आल्यावर त्यांनी शहरातील पूर्व आणि पश्चिम मध्ये असलेल्या महिला रिक्षा चालकांना मदत म्हणून धान्य वाटप करण्यात आले. ह्या वेळेस जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, जिल्हा सदस्या अनिशा खान, क्रांती पष्ठे, लक्ष्मण फुलवरे, सुधीर जाधव, सायली सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
478 total views, 2 views today