श्री सदस्यांचे रक्तदान महायज्ञ

दोन दिवसीय शिबिरात २२३ बाटल्या रक्त संकलित


बदलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा – अलिबाग यांच्या वतीने बदलापुर शहरात दोन दिवसीय रक्तदान शिबिराचा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. या रक्तदान शिबिरात श्री सदस्यांनी २२३ बाटल्या रक्त संकलित केले. श्री सदस्यांनी येथेही आपल्या शिस्तीचे आणि भक्तीचे यथार्थ दर्शन घडविले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा – अलिबाग यांच्या वतीने शनिवारी (ता.२३) व रविवारी (ता.२४) बदलापूर पूर्व येथील आदर्श महाविद्यालयात सलग दोन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शनिवारी १०४ रक्तदात्यांनी तर रविवारी ११९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोशल डिस्टनसिंग पाळले जावे यासाठी रक्तदान करताना गर्दी होऊ नये याची श्री सदस्यांसह उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरांची टीम व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सदस्यांनी केलेल्या या रक्तदानासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
अध्यात्मिक कार्य करतानाच श्री सदस्य नेहमीच राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवीत असतात. वृक्षारोपण कार्यक्रमातही श्री सदस्यांनी ठाणे रायगड जिल्ह्यात लाखो वृक्ष रोपण आणि संवर्धन यशस्वी करून दाखवले आहे. हे कार्य करताना कोणताही गाजावाजा अथवा प्रसिद्धी न करता शिस्तबद्ध पद्धतीने श्री सदस्य कार्य करीत असतात. त्याचे नागरिकांकडून नेहमीच कौतुक केले जाते. दोन दिवसीय रक्तदान शिबिरातही त्यांनी हि शिस्त दाखवून दिली.

 601 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.