दिवेकरांची पाणी प्रतीक्षा संपली

दिवा शहरा करिता १० एमएलडी वाढीव पाणी मिळाले.


माजी उपमहापौर, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्याला यश.


ठाणे : दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या भागांमध्ये मोठ-मोठी निवासी गृहसंकुले उभी राहत असल्यामुळे या भागातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याकारणाने दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते.  दिवा शहराला पाण्याचा पुरवठा हा एमआयडीसी विभागाच्या माध्यमातून करण्यात येतो मात्र याचे व्यवस्थापन नियोजन हे ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येते. दिवा शहरातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्री. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन तसेच शासन दरबारी जलसंपदा विभाग व एमआयडीसी विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन दिवा शहराकरिता १० एम एल डी पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.

सन २०१७ मध्ये दिवा शहरासाठी २१.५० एम एल डी पाणीपुरवठा मंजूर होता दिवा शहरातील लोकसंख्येचा विचार करता किमान २० एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता होती. सदर पाणी वाढविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात होता पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब  यांच्या सहकार्याने मागील वर्षी मंत्रालयात तत्कालीन मंत्री महोदय जलसंपदा विभाग एमआयडीसी विभाग यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करून दिवा शहरा करिता २० एम एल डी अतिरिक्त वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यावेळी १० एमएलडी पाणी उपलब्ध झाले व  काही तांत्रिक कारणास्तव १० एम एल डी  पाणी दिवा शहराला उपलब्ध होऊ शकलेले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दिवा शहरांमध्ये अपुरा पाण्याचा पुरवठा होत असल्या बाबतच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार दाखल होत होत्या. पाणी समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे  याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने तांत्रिक अडचणी दूर करून दिवा शहरा करिता मंजूर केलेले  १० एम एल डी अतिरिक्त पाणी आता उपलब्ध झाले असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होणार आहे. दिवा शहरातील पाणी समस्या निकाली निघाल्याने पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉ. श्री.श्रीकांत शिंदे साहेब, अध्यक्षा दिवा प्रभाग समिती दिपाली भगत, सभापती-क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अमर पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनिता मुंढे, अंकिता पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठामपा निवडणुकीत केलेल्या घोषणेची वचनपूर्ती झाली असल्याच्या प्रतिक्रिया दिवा शहरवासियांना कडून देऊन पालकमंत्री  एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.

 483 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.