मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तीन लाख रुपये

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातुन मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत १५ कोटिहुन अधिक निधी जमा

अंबरनाथ : अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील साई फर्टिलाईजर व ए.आर. सलफोनेट या कारखानदारांकडून तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सद्या कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत भरघोस मदत करावी याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातुन मुख्यमंत्री सहायता निधीत १५ कोटिहुन अधिक निधी जमा झालेला असून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांकडून मदतीचा ओघ अद्याप सुरूच आहे.
अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील ” साई फर्टिलाईजर व ए.आर. सलफोनेट प्रा.लि .” या कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड-१९ साठी तीन लाखांचा धनादेश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे सुपूर्दकेला आहे. आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, उपविभाग प्रमुख प्रल्हाद महाजन, साई फर्टिलाइजरचे शरद गुप्ता, संजय बॅनर्जी, संजय दिग्गल आदी मान्यवर उपस्थित होते.

 377 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.