… तर अंत्यसंस्कार करण्यास मान्यता


 
 महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा निर्णय

 
 पनवेल संघर्ष समितीच्या मागणीला हिरवा कंदिल
 
 पनवेलः कोणत्याही आजाराने अथवा नैसर्गिक मृत्यूनंतरही कोरोना चाचणी करून अहवाल आल्याशिवाय अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नसल्याने मृतदेहाची अवहेलना होत आहे. शिवाय नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास आणि वेदना होत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी मृत्यूनंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ज्यांना अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असेल त्यांच्या ताब्यात तातडीने मृतदेह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी याविषयी आयुक्तांना केलेल्या सुचनेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराचा जटिल बनलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे.
 राज्यभरात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यातून काहींचा मृत्यू होत आहे. काहींचा इतर आजारामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू ओढावत आहेे. मृत्यूनंतर कोरोनाची चाचणी सरकारनेच अनिवार्य केली आहे. परंतु, खासगी अथवा सरकारी चाचणीचा अहवाल मृत्यूनंतर चार ते पाच दिवसांनंतर प्राप्त होत असल्याने मृताच्या नातेवाईंकाना प्रचंड मानसिक यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच मृतदेहाचीही ससेहोलपट होत आहे. शिवाय शासनाचे अंत्यसंस्काराच्या वेळी वेगळे निर्बंध आहेतच. या सार्‍या जाचातून जात असताना मानसिक वेदनांची शृंखलाच बनून राहते.
 त्यातून मार्ग काढताना, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, शासनाच्या निर्देशानुसार कोरोना चाचणी करून संभाव्य परिस्थिीप्रमाणे जर कुणी मृतदेह ताब्यात घेण्यास इच्छुक असतील आणि ठरवून दिलेल्या अटी, शर्तीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास तयार असतील तर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्याची सुचना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे करताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, निर्णय घेतला आणि तशी अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधितांनाही दिल्या. त्याबद्दल पनवेल संघर्ष समितीने आयुक्तांना धन्यवाद दिले आहेत.
 ज्यांना कोरोना संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्याची इच्छा नसेल आणि अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करत मृतदेह शवागृहात ठेवायचा असेल त्यांना तशी मुभाही आहेच. निर्णय ज्यांनी त्यांनी घ्यायचा आहे. कोणावरही हा निर्णय लादलेला नाही. शिवाय कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला तर काहीच प्रश्‍न उरणार नसल्याने अंत्यसंस्काराचा मार्गही मोकळा झालेला आहे.
 
 फौजदारी गुन्हे दाखल झाल्याशिवाय डॉक्टर वठणीवर येणार नाहीत
 
 कोरोनाच्या भीतीने हॉस्पीटल उघडण्याचा काही डॉक्टरांनी देखावा करत रूग्णांच्या डोळ्यात धुळफेक सुरूच ठेवली आहे. त्यामुळे कोळखे येथील अन्य एका रूग्णावर उपचाराअभावी मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पनवेल आणि नवीन पनवेलच्या नामवंत हॉस्पीटलमध्ये रूग्णाला नातेवाईकांना नेले असता उपचार करण्यास नकार दिला. त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढावला आहे. यात नवीन पनवेल येेथील एकाच हॉस्पीटलने दुसर्‍यांदा रूग्ण नाकारला असल्याने त्यांच्या अक्षम्य गुन्ह्यामुळे दुसरा रूग्ण दगावला आहे.

 468 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.