सीमेवर तैनात असलेल्या सैनिक मुलाचा वाढदिवस आईने केला वेगळ्या पद्धतीने साजरा

सरस्वती प्रधान यांनी वाढदिवसानिमित्त केले अन्न धान्याचे वाटप

डोंबिवली : मुलगा देशाच्या सीमेवर असताना आपल्या मुलांचा वाढदिवस हा गरिबांना सुखाचा जावा आणि कोरोनामुळे लॉकडाऊन मध्ये काम नसल्याने गरिबांचे पोट भरावे या उद्देशाने त्याच्या आईने डोंबिवलीतील सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या सहकार्याने गोर गरिबांना अन्नधान्य दिले. आपल्या आईने गरिबांना अन्नधान्य दिल्याचे समजल्यावर मुलाच्या डोळ्यातून आंनदाश्रू आल्याशिवाय राहणार असे संघटनेच्या अध्यक्षा स्वाती मोहिते यांनी यावेळी सांगितले.

डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील सरस्वती प्रधान यांचा मुलगा मिलिटरी मध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. लॉकडाऊन मध्ये गरिबांना अन्नधान्याची जास्त गरज असल्याने त्यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना अन्नधान्य देण्याचे ठरविले. प्रधान यांची मैत्रीण गीतांजली पाटील यांनीही मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रधान आणि पाटील यांनी डोंबिवलीतील सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या अध्यक्षा स्वाती मोहिते यांना संपर्क केला.मोहिते यांनीही या समाजकार्याचे कौतुक केले. प्रधान आणि पाटील यांनी सदर संघटनेकडे ५० किलो साखर, ४० किलो तांदूळ ,चहापावडर असे समान दिले. संघटनेच्या अध्यक्षा मोहिते यांनी हे अन्नधान्य गरिबांमध्ये वाटप केले. कोरोनोच्या या काळात अश्या प्रकारे गरिबांना मिळणारे हात पुढे येत असल्याचे दिसत आहे.

 413 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.