मनसे व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रयत्नाला यश
ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग निद्रिस्त
ठाणे : घरात दोघेजण कोरोना पाॅझिटिव्ह…ठाणे पालिकेचा आरोग्य विभागही दाद देईना…अखेर मनसेच्या पदाधिकार्यांनी ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करुन या पाॅझिटिव्ह रुग्णांना दाखल करुन घेण्याची विनवणी केली. त्यामुळे सुञं वेगाने फिरली. आणि या रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी अँबुलन्स ९ तासांनी दाखल झाली. माञ यातून पुन्हा एकदा ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग कुचकामी ठरला.
ठाण्यात वागळे इस्टेट येथील रुग्णाचा अँबुलन्सच्या भोंगळ कारभारापायी मृत्यू झाल्याची घटना ताजी होती. त्यावेळी महात्मा फुले नगर येथे एकाच कुटुंबातील दोघांचा दुपारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला. त्यांनी आरोग्य विभागाला संपर्क साधला. माञ त्यांनी दाद दिली नाही. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांना याबाबत संपर्क साधला. या प्रकरणी पाचंगे यांनी ठाणे पालिकेचे आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे व माळगावकर यांना वारंवार संपर्क साधला. माञ त्यांनीही दाद न दिल्याने अखेर पाचंगे यांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांना संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणी त्वरित दाद देत राञी ११ वाजता अँब्युलन्स उपलब्ध करुन दिली. या कुटुंबाने मनसेसह आपत्ती व्यवस्था कक्षाच्या संतोष कदमांचेही आभार मानले.
पालिका अधिकार्यांची पालक मंञ्यांच्या आदेशाला केराची टोपली
पालकमंञी एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी पालिका अधिकार्यांना धारेवर धरले. माञ तरीही अधिकारी ताळ्यावर येत नसतील. तर हे मोठे दुर्देव आहे. त्यातून ठाणेकरांच्या संतापाचा स्फोट होईल असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.
1,156 total views, 2 views today