बदलापूरसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा – कालिदास देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्याना साकडे : वाढती रुग्ण संख्या शहरासाठी धोकादायक
बदलापूर : कोरोनाच्या रुग्णांची बदलापूर मध्ये संख्या सातत्याने वाढत आहे. हि वाढ धोकादायक आहे. हि रुग्णांची संख्या लक्षात घेता यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी बदलापूर आणि अंबरनाथ शहरासाठी स्वतंत्र आय. ए. एस. दर्जाच्या विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, कोविद रुग्णालय सुरु करण्यात यावे तसेच यासाठी विशेष निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बदलापूर शहरात आतापर्यन्त कोरोनाचे शंभरच्या वर रुग्ण आढळलले आहेत. रोज हि संख्या वाढत आहे. हि वाढ धोकादायक आहे. बदलापूर शहरातून हजारो अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी मुंबई ठाणे येथे ये जा करीत असतात. आता पर्यंत जे रुग्ण आढळले आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण हे असे अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हि वाढ लक्षात घेऊन बदलापूर आणि अंबरनाथ शहरासाठी स्वतंत्र आय. ए. एस. दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम कार्यरत करावी, विशेष कोविड रुग्णालय सुरु करावे, त्यासाठी विशेष निधी आणि अधिकारी व कर्मचारी यांचीही उपलब्धता करून द्यावी अशी मागणी या निवेदनात कालिदास देशमुख यांनी केली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये करणे अशक्य असल्याने बदलापूर व अंबरनाथ शहरातील मंगल कार्यालये, शाळा, महाविद्यालये त्याच प्रमाणे मोठ्या गृह संकुलातील उभ्या राहिलेल्या इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी या रुग्णांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी कालिदास देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आल्या असल्याचे कालिदास देशमुख यांनी सांगितले.

 690 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.