नवी मुंबईत पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा

आमदार गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात १३ मे रोजी पत्र पाठवले आहे.
पावसाळा तोंडावर आलेला आहे. शहरात नालेसफाई ,रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची दुरुस्ती व सफाई तसेच इतर अत्यावश्यक कामे लवकरात लवकरात लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. ही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबून संकटकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच covid-19 नियमांचं पालन करून पावसाळापूर्व कामे ३१ मे पूर्वी मार्गी लागली पाहिजेत असे लोकनेते नाईक यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी वाढते. साथीचे आजार उद्भवू शकतात. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना योग्य ती मदत पुरवावी लागते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. या सर्व बाबींचे पालिका प्रशासनाने वेळीच नियोजन करावे असा सल्ला देखील नाईक यांनी दिला आहे.

घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा.
घनसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. असुरळीत वीज पुरवठ्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील अनेक विद्युत उपकरणे नादुरुस्त होतात त्याचा आर्थिक भुर्दंड रहिवाशांना बसतो. या परिसरात अनेक ठिकाणी उघड्या विद्युत डीपी आहेत. त्याचा धक्का लागून अपघात संभवतात. विजेच्या धक्क्याने यापूर्वी लहान मुले आणि इतर रहिवाशी जखमी झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, परिसरातील ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत. विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. हे सर्व धोके आणि रहिवाशांना होणारा त्रास लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. घनसोली वीज कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि परिसरातील विद्युत समस्या दूर कराव्यात अशी मागणी लोकनेते नाईक यांनी अधीक्षक अभियंता यांना १३मे रोजी पाठवलेल्या पत्रात केली आहे.

 514 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.