आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून राबवण्यात आला उपक्रम
नवी मुंबई : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता ओळखून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आज सीबीडी सेक्टर-१ येथील पोलीस वसाहतीमधील पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिक नगरसेवक अशोक गुरखे व माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांच्या हस्ते मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस वसाहतीमधील असंख्य महिला उपस्थित होत्या.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस अहोरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करित आहेत. राज्यातील अनेक पोलीस बांधवाना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांना एका बाजूला संसाराचा गाडा चालवणे व दुसऱ्या बाजूला कोरोनाची लढाई अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पोलीस बांधवांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता आज सीबीडी सेक्टर – १ मधील पोलीस वसाहतीमध्ये मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. संपूर्ण बेलापूर मतदारसंघात प्रत्येक गरजवंतांपर्यंत माझे प्रतिनिधी पोहचत असून कोठेही धान्याची कमतरता भासणार नाही याची मी स्वतः काळजी घेत आहे. यावेळी पोलीस वसाहतीमधील असंख्य महिलांना मोठा दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
655 total views, 1 views today