एसटी बसने हे सर्वजण कल्याणपर्यंत व त्यापुढील विशेष रेल्वेने बिहारला रवाना झाले .
बदलापूर : बदलापुर मध्ये वास्तव्य असलेल्या बिहार मधील नागरिक शनिवारी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाले. बदलापूर पूर्व भागातून ३०० तर बदलापूर पश्चिम भागातून ३४२ जण रवाना झाले. बदलापूर पश्चिम भागात रेल्वे स्टेशन जवळच्या पोलीस चौकी परिसरातून तर पूर्व भागात बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन परिसरातून त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली. एसटी बसने हे सर्वजण कल्याणपर्यंत व त्यापुढील विशेष रेल्वेने बिहारला रवाना झाले . शिवसेना शाखाप्रमुख भरत नवगिरे यांनी या नागरिकांना रजिस्ट्रेशन व आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले होते. तसेच या कामगारांना घरी जाताना पाण्याच्या बाटल्या आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाा शिवसेनेतर्फे करण्यात आली होती.
558 total views, 1 views today