होमिओपॅथी औषधांचे वाटप

शिवसना उपशहरप्रमुख आणि समाजसेवक ह.भ.प. पुरूषोत्तम उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

अंबरनाथ : आयुष मंत्रालयाने निर्देशीत केलेल्या अर्सेनिक एआयबी ३० या गोळ्यांचे वाटप येथील खेर विभागात सकाळी नऊ ते ११ आणि संध्याकाळी सहा ते आठ यावेळेत सामाजिक अंतर राखून केले जात आहे. शिवसना उपशहरप्रमुख आणि समाजसेवक ह.भ.प. पुरूषोत्तम उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील नागरिकांनाही या गोळया दिल्या जात आहेत. डॉ.सरिता रसाळ- काळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उगले यांनी केले आहे. पुरूषोत्तम उगले यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवमंदिर रोड, खेर विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे या गोळया मिळतील.

 987 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.