ज्येष्ठ शिवसैनिक मोहन चेंदवणकर यांचे निधन

१९७५ ते १९८१ ह्या सहा वर्षांत, दादरच्या सेनापती बापट मार्गावर, बाळासाहेब ठाकरे कुटूंबिय रहात असतांना, प्रबोधनकारांची सेवा, मिनाताई यांचा आशिर्वाद व खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विश्वास मोहन चेंदवणकर यांनी सहज प्राप्त केला होता.

बदलापूर : बदलापूर मधील ज्येष्ठ शिवसैनिक मोहन चेंदवणकर यांचे अलीकडेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा संगीता या त्यांच्या कन्या होत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोहन चेंदवणकर हे कट्टर समर्थक होते. १९७५ ते १९८१ ह्या सहा वर्षांत, दादरच्या सेनापती बापट मार्गावर, बाळासाहेब ठाकरे कुटूंबिय रहात असतांना, प्रबोधनकारांची सेवा, मिनाताई यांचा आशिर्वाद व खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विश्वास मोहन चेंदवणकर यांनी सहज प्राप्त केला होता. १९९१ पासून ते बदलापूरच्या सर्वोदयनगर येथे रहात होते. शिवसेना नेते सूर्यकांत महाडिक ह्यांनी मोहन चेंदवणकर यांना सेनेतील योगदानाबद्दल सन्मान पत्र दिले होते. वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी आदी शिवसेनेच्या पहिल्या फळीच्या नेत्यांचा सहवास त्यांना शिवसेनेचे काम करतांना लाभला. बदलापूर मध्ये सर्वोदय नगर शाखाप्रमुख, गणेशोत्सव मंडळ, सिंधुदूर्ग रहिवासी मंडळ, पोलिस मित्र. अतिवृष्टी, सोसायटी, गणेश मंदिर स्थापना असे विविध कार्यात मोहन चेंदवणकर हे आघाडीवर काम करत. शिवसेनेच्या जाहीर सभा सुरु होताना त्यांची गगनभेदी घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. मोहन चेंदवणकर यांचा अनेक वेळा सत्कार झाला आहे.
मोहन चेंदवणकर यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार किसन कथोरे, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, नगराध्यक्ष एड, प्रियेश जाधव, मनसेचे नेते विकास गुप्ते, उमेश तावडे, भाजपचे शहर अध्यक्ष संजय भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आदींनी मोहन चेंदवणकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 1,229 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.