शिवसेना माजी आमदार सुभाष भोईर यांनी राबवला उपक्रम
दिवा : सुभाष भोईर शिवसेना माजी आमदार यांच्या सौजन्याने दिव्यातील मेट्रो हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० व्यक्तींनी रक्तदान केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना शक्य तितक्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सुमित हॉल येथे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित मित्र मंडळाच्या सभासदांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिरात सुमारे १५० दिव्यातील नागरिकांनी रक्तदान केले आहे. सदर रक्तदान शिबिराला आयोजक सुमित सुभाष भोईर यांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत मेट्रो हॉस्पिटलचे डॉ. महेंद्र तावडे व सुमित मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थिती होते. यावेळी रक्तदान करणाऱ्याना शुभेच्छा पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
675 total views, 1 views today