परिचारिका दिनानिमित्त आयोजित केला उपक्रम
अंबरनाथ : परिचारिका दिनानिमित्त अंबरनाथ येथील डॉ. छाया उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या परिचारिकांना मनसेचे जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदिप लकडे यांनी अनोखी भेट दिली. सध्याच्या करोना संकट काळात स्वत:च्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या परिचारिकांना मनसेच्या वतीने मंगळवारी पीपीई संच दिले. डॉ. शशिकांत दोंडे, डॉ.शुभांगी वाडेकर यावेळी उपस्थित होते. संदीप लकडे यांनी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
524 total views, 1 views today