काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे सोने ताब्यात घ्यावे असे आवाहन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
लॉकडाऊनमुळे देशातील कामगार, शेतकरी, असंघटीत कामगार, उद्योजकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी २१ लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली.
त्यानंतर सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी मागणी त्यांनी पुन्हा केंद्राकडे केली.
460 total views, 1 views today