आयकरसाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत : टीडीएस टीसीएसमध्ये २५ टक्के कपात


लघु व मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे कर्ज देणार

नवी दिल्ली-मुंबई : लॉकडाऊनमुळे भेडसाव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीत नागरिकांना आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांना उत्पन्नावरील आयकर भरण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि ऑडिट करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देत टीडीएस आणि टीसीएसच्या दरात थेट २५ टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच ही कपातीची सूट ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार असून यातून ५० हजार कोटी रूपये थेट नागरिकांच्या हातात राहतील आणि त्याचा फायदा बाजाराला होणार असल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजकांना दिलासा देण्यास प्रयत्न केला.
याशिवाय सरकारी कामे पूर्ण करणाऱ्या सर्व ठेकेदारांना त्यांची काम पूर्ण करण्यासाठी ६ महिन्याची मुदतवाढ दिली. याशिवाय गृहनिर्माण प्रकल्पातील अर्धवट प्रकल्पांनाही ही ६ महिन्याची मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय लघु व मध्यम उद्योजकांच्या हातात पैसा खेळता रहावा यासाठी ३ लाख कोटी रूपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही हमीची-जामीनाची गरज नाही. तसेच या उद्योजकांना कर्ज दिल्यानंतर त्यांना किमान १ वर्षभर मुद्दल फेडिस मुदत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय २०० कोटी पर्यंतच्या निविदा या यापुढे आंतरराष्ट्रीयस्तरावरील कंत्राटदाराला न देता या निविदा देशातील कंत्राटदारांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगत कामगारांच्या हाताला काम आणि कंत्राटदारांना काम देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 438 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.