ग्रामीण भागाला ‘भाजप’कडून भरीव मदतीचे वाटप

सव्वादान लाख किराणा सामान पाकिटे वितरीत

मुरबाड : संचारबंदी सुरू झाल्यापासून ठाणे जिल्ह््यात गोरगरीब आणि हातावर पोट असणाºया कष्टकरी वर्गाला शासन, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यथाशक्ती मदत करीत आहेत. ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत मदत कार्य सुरू आहे.
ठाणे ग्रामीण परिसरात असलेले कातकरी, ठाकुर आदिवासी, विधवा, निराधार महिला, रिक्षाचालक, बारा बलुतेदार, परप्रांतीय मजुर आणि गोरगरीब नागरिकांना ३ एप्रिल ६ मे दरम्यान २ लाख २४ हजार ७५८ अन्नधान्य आणि किराणा माल सामानाची पाकिटे वाटण्यात आली आहेत. तसेच ३५ हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेले सॅनिटायझर आणि मास्क ४३ हजार २२५ नागरिकांना देण्यात आले. १५० निराधार नागरिकांचे जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याकाळात विधि ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये एकुण ३८२ जणांनी रक्तदान केले. याशिवाय पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी अडीच हजार नागरिकांनी २३ लाख रूपये दिले.
कुळगांव-बदलापूर शहर, अंबरनाथ ग्रामीण, मुरबाड शहर आणि ग्रामीण, शहापूर शहर आणि ग्रामीण तसेच भिवंडी ग्रामीण परिसरात हे मदतकार्य अजूनही सुरू आहे.

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.