केंद्राकडे वीस कंपनीची मागणी -गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे.
त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
558 total views, 1 views today