राष्ट्रवादी तर्फे परिचारिकांना सुविधा वस्तू चे वाटप

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून केले उपक्रमाचे आयोजन

बदलापूर : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना आरोग्य सुविधा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर तर्फे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील मुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर असलेल्या परिचारिकांना पीपी किट, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाइझर, फेस मास्क चे वाटप करण्यात आले.
संचारबंदी सुरु झाल्यापासून बदलापूर शहरात तसेच आसपासच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख हे अविरतपणे आपल्या माध्यमातून गोरगरीब, गरजू ,किंवा शहरातील विविध भागात सर्व स्तरावर कुठलाही गाजावाजा न करता मदत करत आहेत,
आज ग्रामीण भागात मुळगावतील प्राथमीक आरोग्य केंद्रावर आपला मदतीचा हात देतांना कालिदास देशमुख ह्यांचे परिचारिका कडून कौतुक करण्यात आले. आजचा आमच्या परिचारिका दिवसाची आपण आठवण ठेऊन आपण आलात आणि आमची काळजी घेतली ह्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे आरोग्य केंद्राने आभार मानले.
ह्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, जिल्हा महिला राष्ट्रवादी च्या सदस्यां अनिशा खान , लक्ष्मण फुलवरे, सुनील पगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.