वांगणित पहिला कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण

वांगणीमधील बंदोबस्त वाढवण्यात आला असून दुकाने व अन्य बाजारपेठ बंद आहे.

बदलापूर : आतापर्यंत कोरोना पासून लांब असलेल्या वांगणी गावात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आहे. वांगणी येथील एकविरा नगर मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. वांगणीत प्रथमच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरील रुग्णाला भिवंडीतील इंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांगणीमधील बंदोबस्त वाढवण्यात आला असून दुकाने व अन्य बाजारपेठ बंद आहे.
वांगणीमध्ये आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना राहत्या घरीच कोरोनटाईन करण्यात आले आहे. त्यांची अंबरनाथ येथील छाया रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे व त्यांचे नमुने जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. रुग्ण राहत असलेल्या चाळी देखील सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन वांगणी ग्रामपंचायत व पोलिसांनी विशेष खबरदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत वांगणी परिसर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आलेल्या चाळींमध्ये सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात यावी यासाठी आरोग्य निरीक्षक राजेंद्र देवरे, आरोग्य निरीक्षक डी. एस पाटील, आर. पी. चव्हाण, आरोग्य सेवक आगीवले, जगताप, भोंगळे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळत काळजी कशी घ्यावी याबाबत येथील नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. पोलीस उप निरीक्षक भरत सोनावणे, पोलीस नाईक जितेंद्र वारके, महेश भोईर, घोडके, विनोद ठाकुर आणि चेतन पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वांगणी परिसरातील नागरिकांना आवाहन करीत घरात राहण्याबाबत सूचना देत जनजागृती केली.

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.