आदर्श आहारने तंदुरुस्ती मिळवा – डॉ. ज्योती सोळुंके

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा

परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज खो-खो खेळाडूंच्या आदर्श आहारा विषयी परभणी येथील डॉक्टर ज्योती सोळुंके यांनी मार्गदर्शन केले.

खेळाडूंनी कितीही व्यायाम किंवा कसरती केल्या तरी त्यांचा आहार सकस नसेल तर मात्र त्याच्या क्षमतेत कमतरता ही नक्कीच जाणवेल. आहार सकस असेल तर मात्र खेळाडूंच्या क्षमतेत फरक लगेच लक्षात येईल हे आपल्याला जाणवेल असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आवर्जून सांगितले. खरतर खेळाडूच नव्हे तर सामान्य व्यक्तिला सुध्दा आदर्श व सकस आहार त्यांना नेहमीच उत्साही ठेवतो. फक्त हा आदर्श आहार घेताना सरसकट सर्वांना एकच ठेवून चालणार नाही.

आदर्श व सकस आहार ठरवताना वय, वजन, ऊंची, लिंग आदि गोष्टी विचारात घेवून प्रत्येकासाठी वेगवेगळा आहार निश्चित करावा लागतो. नेहमीची व्यक्ति व खेळाडू यांना सुध्दा वेगवेगळा आहार ठरवावा लागतो. खो-खो खेळाडूंना कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थ जास्त महत्वाचे असून जेणेकरून त्यांना प्रचंड ऊर्जा मिळू शकते. तर प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे मसल ब्रेक डाउन थांबण्यासाठी व मसल मजबूत होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तसेच खेळाडूंनी प्रत्यक्ष खेळण्यापूर्वी, खेलदरम्यान व खेळांनंतर वेगवेगळे पदार्थ किंवा पेय (इलेक्ट्रॉन, ग्लुकोज इ.) घेणे फारच महत्वाचे असल्याचे त्यांनी संगितले. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला घेणे फारच महत्वाचे असल्याचेही डॉ. ज्योती सोळुंके यांनी संगितले.

शाकाहारी व मांसाहारी खेळाडूंसाठी वेगवेगळे डायट प्लान सुध्दा त्यांनी संगितले. शाकाहारी व्यक्तीने सकाळी ६.०० वाजता लिबू पाणी , आवळा सरबत, संतरा सरबत यापैकी एक दररोज एक पेला घ्यावा. त्यानंतर ८.३० वाजता मोड आलेले मिक्स कडधान्य किंवा डाळी, दोन केळी व एक रागीचा लाडू एक प्लेट खावे. १२.३० वाजता ३ चपाती + एक वाटी भात +एक वाटी डाळ +सॅलड + दही +एक वाटी फळभाजी + एक चमच शेंगण्याची किंवा तीळाची चटणीचा समावेश असावा. ४.०० वाजता एक गूळ-शेंगदाण्याचा लाडू + १०० ग्रॅम पनीर + ड्रायफ्रूट शेक. ९.०० वाजता २ चपात्या + भाजी + मिक्स डाळीची खिचडी तर १०.०० वाजता एक ग्लास दूध असा उदाहरण म्हणून एक प्लान त्यांनी संगितला.

तसेच सहज उपलब्धतेनुसार गूळ-शेंगदाणे, रागीचे लाडू आदीचा वापर करत तंदुरुस्त कसे राहता येईल याबद्दल सुध्दा मार्गदर्शन केले.

ही ऑनलाइन कार्यशाळा अतिशय उत्तम रित्या पार पडावी यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. संतोष कोकिळ, डॉ. संतोष सावंत, डॉ. सुनील मोडक, सुशील इंगोले व पवन पाटील आदि झटत आहेत.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.