मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

मुख्यमंत्री म्हणून आपण लक्ष घालावे आणि त्यांना या संकटातून बाहेर काढावे अशा आशयाचे पत्र ठाणे फोटोजर्नालिस्ट वेल्फेर अससोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
ठाणे  :  कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तशीच वेळ ठाण्यातील मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकारांवर देखील आली आहे. ठाण्यात मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकारांची संख्या बरीच आहे त्यांना एका फोटो वर मानधन मिळते पण या कोरोना महामारी च्या भयंकर संकटात त्यांचा उधर निर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. काही जण ज्या वर्तमानपत्रासाठी काम करतात त्याच्या पुरवण्या छापणो बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात आता मुख्यमंत्री म्हणून आपण लक्ष घालावे आणि त्यांना या संकटातून बाहेर काढावे अशा आशयाचे पत्र ठाणे फोटोजर्नालिस्ट वेल्फेर अससोसिएशन च्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
अनेक वृत्तपत्रंच्या पुरवण्या बंद झाल्याने छायाचित्रकारांचे फोटो छापणो बंद झाले आणि फोटो वर पैसे मिळत असल्याने पैसे ही मिळणे कठीण झाले आहे.  कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत जीव धोक्यात टाकून फोटो काढून सुद्धा वर्तमान पत्र फोटो छापतील याची खात्री नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या मध्ये काही छाया चित्रकारांचे घरांसाठी घेतलेले कर्ज असून त्याचे हफ्ते काही बँकेनी हप्ते सुध्दा कापून घेतले आहेत. वास्तविक पहात बॅंकानी तीन महिने हप्ते कापू नये असे आपलेच आदेश आहेत. परंतु तरी देखील त्याकडे बॅंकानी दुर्लक्ष केले आहे.  काही जणांनी घरात छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी कर्ज घेतलले आहे. त्यांचे पण फोन येत आहेत अशा सर्व संकटांनी ग्रासलेल्या परिस्थितीत सुद्धा विनासुरक्षा मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकर काम करत आहेत आणि त्यांना कुठल्या विम्याचे कवच नाही आणि कुठल्याही सुविधा नाहीत. अशा या महाभयंकर परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे मायबाप सरकार महाराष्ट्राला लाभलेले कर्तव्यनिष्ठ चांगले मुख्यमंत्री यांच्या कडून भरपूर अपेक्षा आहेत, त्यांनी या मुक्त छायाचित्रकरांना मदतीचा हात दयावा आणि या महाभयंकर कोरोनाच्या संकटातून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवावे ही कळकळीची विनंती पत्रकाद्वारे मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकारांनी केली आहे .

 395 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.