राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाने राखले सामाजिक बांधिलकीचे भान

जेवणाची पाकीटे, दूध पावडर, ओआरएस, टोप्या पाण्याच्या बाटल्या, मास्क आदी जीवनावश्यक किटचे केले मजुरांना वाटप

कल्याण : सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असून त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांना बसला आहे. अशा शेकडो मजुरांना राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागातर्फे सामाजिक भान जपत आज जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या भितीपोटी अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजुरांच्या खाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्री भैरव सेवा समिती आणि भिवंडी जैन सोशल युवा ग्रुपच्या सहकार्याने जेवणाची पाकीटे, दूध पावडर, ओआरएस, टोप्या पाण्याच्या बाटल्या, मास्क आदी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, अधीक्षक नितीन घुले, उपअधीक्षक हांडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे, दुय्यम निरीक्षक सुजित कपाटे, विक्रांत जाधव यांच्यासह एस.डी पवार, एच.डी. खरबस, साळवे आदी जवानांनी विशेष मेहनत घेतल्याची माहिती कल्याण विभागातर्फे देण्यात आली.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.