९ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल : पण निवडणूक बिनविरोध होणार


खबरदारी म्हणून भाजपा, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी २ जणांचे जास्तीचे अर्ज : १ अपक्ष रिंगणात

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. या निवडणूकीत जरी १४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले तरी यापैकी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकी दोन डमी उमेदवारांचे अर्ज भरले. अधिकृत उमेदवारांचे अर्ज छाणनीत मंजूर झाल्यानंतर डमी उमेदवार आपले अर्ज मागे घेणार आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे.
डमी उमेदवार- संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).
शिवसेनेकडून अधिकृत म्हणून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), तर राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी अर्ज भरला तर डमी म्हणून आणि खबरदारी म्हणून किरण जगन्नाथ पावसकर, शिवाजीराव यशवंत गर्जे यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला.
याशिवाय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.) यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यापूर्वी ८ मे रोजी चार उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामध्ये गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा) यांचा समावेश आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून राठोड शेहबाज अलाउद्दीन यांनीही आपला अर्ज आजच भरला.
नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ मे रोजी होणार असून नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मे २०२० आहे.

 491 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.