मास्क वापरण्यासाठी व्हिस्टाप्रिंटचे प्रोत्साहन

सोशल मीडियावर ‘मेकयुअरमास्क’ स्पर्धा; पर्सनलाइज्ड मास्क केले लाँच

मुंबई : फेसमास्क हे ड्रॉपलेटवर आधारित कोरोना व्हायरसविरुद्ध ढाली सारखे काम करते. जास्तीत जास्त लोकांनी फेस मास्क वापरावेत या उद्देशाने डिजिटल प्रिंटिंगमध्ये अग्रेसर असलेल्या व्हिस्टाप्रिंटने सोशल मीडिया माध्यमांद्वारे ‘मेकयुअरमास्क’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्हिस्टाप्रिंट स्पर्धकांना त्यांची सर्जनशीलता वापरण्यास तसेच भविष्यात ते मास्कवर कोणती डिझाइन ठेवू इच्छितात ते शेअर करण्यास प्रोत्साहित करत आहे. सर्वाधिक प्रभावी डिझाइनच्या निर्मात्यास ब्रँडकडून पर्सनलाइज्ड मास्क जिंकण्याची संधी मिळेल.

प्रि-प्रिंटेड मास्कनंतर व्हिस्टाप्रिंटने पोर्टफोलिओचा विस्तार करताना पर्सनलाइज्ड मास्क हे नवे उत्पादन सादर केले आहे. पर्सनलाइज्ड मास्क हे इमेज, टेक्स्टला सपोर्ट करतात तसेच काही सोप्या टप्प्यांमध्ये ते तयार करता येतातत. हे मास्क किफायतशीर, टिकाऊ असून धुण्याजोगे तसेच पुन्हा वापरण्यायोग्य आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून हा ब्रँड समाज संरक्षण आणि भारतासाठी निर्मितीचा आनंद आणि उत्साहवर्धक वातावरण तयार करण्यास कटिबद्ध आहे.

व्हिस्टाप्रिंट इंडियाचे सीईओ भरत शास्त्री म्हणाले, ‘सध्याच्या काळात स्वत:ला आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास प्रोत्साहित केल्यापासून, त्याबाबत अनेक गंमती होत आहेत. एखादा संदेश देण्यासाठी किंवा आपली ओळख परिधान करण्यासाठी ते पर्सनलाइज्ड केले जात आहे. पर्सनलाइज्ड मास्क आणि या स्पर्धेमुळे लोक मास्क घालण्यास अधिक प्रोत्साहित होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.