खेळाडूंनी उपचारापेक्षा काळजी घेणे महत्वाचे – डॉ. अमित रावते

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा

परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज खो-खोतील सर्वसामान्य इजा, प्रतिबंध व उपचार या विषयावर मिरज येथील डॉ. अमित रावते यांनी मार्गदर्शन केले.

शारीरिक दुखापती झाल्यानंतर जे व्यायाम तुम्ही कराल त्याएवजी हेच व्यायाम जर शारीरिक इजा होण्यापूर्वी तुम्ही केले तर नक्कीच त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळेल असे डॉ. अमित रावते यांनी मार्गदर्शन करताना संगितले. शारीरिक दुखापतींच्या बाबतीत विचार केला तर मात्र व्यायामाला खूपच महत्व द्यावे लागेल. जर वॉर्मअप शिवाय खो-खो चा सराव केला तर मात्र खेळाडूला धावताना, खुंट मारताना, सूर मारताना वेगवेगळ्या दुखापती होऊ शकतात. यात प्रामुख्याने खांद्याच्या, हाताच्या, पाठीच्या, कंबरेच्या, गुडग्याच्या व घोट्याच्या दुखापती प्रमुख आहेत. त्या कशा थांबवाव्यात अथवा त्यापासून सुटका कशी करावी याचा विचार केला तर मात्र सरावाआधी बॉडी वॉर्मअप व सारावानंतर बॉडी कंडीशनिंग याला पर्याय नाही.

जर खेळताना दुखापत झाली तर मात्र पुन्हा खेळण्यापूर्वी प्रथमोपचार फारच महत्वाचा आहे. शिवाय त्यानंतर करावा लागणारा रिहॅबिलेशन प्रोग्रामला महत्व द्यावे लागेल. त्यासाठी जंक फूडला फाटा देऊन पौष्टिक आहाराला प्रथम प्राधान्य देणे म्हत्वाचे असल्याचे फिझीयोथेरेपिस्ट डॉ. ॠचा गाडगीळ यांनी सांगितले. प्रत्येक दुखापतीनंतर आराम घेणे व त्यासाठी रिहॅबिलेशन प्रोग्राम करणे हि काळाची गरज असल्याचेही सांगितले. तसेच उपचारत फेसीयल गण, ड्राय निडल, टेप्स आदींचा वापर योग्य मार्गदर्शकच्या देखरेकीखाली घ्यावेत असेही स्पष्ट केल.

ही ऑनलाइन कार्यशाळा अतिशय उत्तम रित्या पार पडावी यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. संतोष कोकिळ, डॉ. संतोष सावंत, डॉ. सुनील मोडक, सुशील इंगोले व पवन पाटील आदि परिश्रम घेत आहेत.

 415 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.